Tuesday, March 18, 2014

फँड्री - जीव झाला येडा पिसा

जीव झाला येडा पिसा

जीव झाला येडा पिसा रात रात जागण
पूर दिस भर तुझ्या फिरतो माग मागन !!2!!

जादू मंतरली कोणी सपनात जागपणी
नशिबी भोग असा दावला  
तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला !!2!!
माग पळून पळून वाट माझी लागली
अन तू वळून बी माझ्याकड पाहीना

भिर भिर मनाला या घालू कसा बांद
अवसची रात मी अन पुनवचा तू चांद ग !!2!!
 नजरत मावतिया तरी दूर धावतिया
मनीचा ठाव तुझ्या मिळना
आता तोंडा मोर घास तरी गीळना
गेला जळून जळून जीव प्रीत जूळना  
सारी इस्कटून जिंदगी मी पाहिली
तरी झाली कुठ चूक मला कळना

सांधी कोपऱ्यात उभा एकला कधीचा
लाज ना कशाची तकरार नाही
भास वाटतोया हे खर का सपान
सुखाच्या या सपनाला दार नाही !!2!!


राख झाली जगण्याची हाय तरी जिता
भोळ प्रेम माझं अन भाबडी कथा
बघ जगतूया कस, साऱ्या जन्माच हस
जीव चिमटीत असा घावला
तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला !!2!!
 माग पळून पळून वाट माझी लागली
अन तू वळून बी माझ्याकड पाहीना

हे खरकट्या ताटावर रेघोट्याची झालर
हातावर पोट बिदागीची झुणका भाकर !!2!!
उन्हा तान्हात भुका घसा पडलाय सुका
डोळ्यातलं पाणी तरी खळना
आता तोंडा मोर घास तरी गीळना
गेला जळून जळून जीव प्रीत जूळना  
सारी इस्कटून जिंदगी मी पाहिली
तरी झाली कुठ चूक मला कळना

-फँड्री
- From movie Fandry